दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी माळकरंजातून चारा व्यवस्थापनाचा नवा मार्ग

Spread the love

६० महिलांना ‘BHN-11’चे ३० हजार ठोंबे वाटप

  • महिला-पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप
  • निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यात रूपांतर
  • अझोला,हायड्रोपोनिक्स आणि काटेविरहित निवडुंगाचे प्रात्यक्षिक

धाराशिव – पावसाने ओढ दिली की शिवारातील हिरवाईबरोबरच पशुपालकांच्या चिंतेतही भर पडते.जनावरांसाठी वर्षभर चारा कुठून आणायचा,उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा उपयोग कसा करायचा आणि मर्यादित पाण्यात हिरवा चारा कसा पिकवायचा, हे प्रश्न दुष्काळसदृश परिस्थितीत अधिक तीव्र होतात.याच प्रश्नांवर प्रत्यक्ष उपाय सांगण्यासाठी माळकरंजा येथे मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी चारा लागवड,निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच योग्य चारा व्यवस्थापनाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.बायफ संस्थेचे अध्यक्ष डॉ.मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,कळंब तहसीलदार श्री.हेमंत ढोकले, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.दीपक मुळे,डॉ.हनुमंत गायके,डॉ.बायस, डॉ.वैभव पाटील,डॉ.पांडुरंग इंगळे, डॉ.राऊत,तसेच बायफ संस्थेचे श्री.अतुल मुळे,नूतन क्षीरसागर व श्री.संताजी मिसाळ उपस्थित होते. कळंब तालुक्यातील विविध विभागांचे तसेच उमेद अभियानाचे अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागात पशुधन सांभाळण्याची मोठी जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असते. जनावरांचे चारा-पाणी,निगा आणि दुग्ध व्यवसायातून कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यापर्यंत त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे या उपक्रमात महिला पशुपालकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले.

उमेद अभियानाच्या माध्यमातून निवड झालेल्या कळंब तालुक्यातील दहा गावांमधील ६० महिलांना हिरवा चारा लागवडीसाठी ‘BHN-11’ हायब्रीड नेपियर चाऱ्याचे एकूण ३० हजार ठोंबे वाटण्यात आले.याशिवाय उपस्थित सुमारे १२५ महिला व पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले.

निकृष्ट चाऱ्यातूनही पोषणाचा मार्ग
दुष्काळात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यानंतर हाताशी असलेल्या चाऱ्याचा योग्य वापर करणे पशुपालकांसाठी महत्त्वाचे ठरते.

  • Related Posts

    दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावेजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन ; ८ ऑक्टोबरला बैठक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे.या प्रयत्नांना सेवाभावी संस्था,व्यक्ती आणि महाविद्यालयांची साथ मिळाल्यास दुष्काळाशी अधिक प्रभावीपणे सामना…

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना CPR प्रशिक्षण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *