नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुका क्रीडा संकुल पार्किंगसाठी अधिग्रहित

Spread the love

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

धाराशिव – तुळजापूर येथे ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन नळदुर्ग रोड येथील तालुका क्रीडा संकुल पार्किंग व्यवस्थेसाठी अधिग्रहित करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिले आहेत.

श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवासाठी राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजापूरमध्ये दाखल होतात.त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी होते.

नळदुर्ग मार्गे तुळजापूर येथे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था असणे आवश्यक आहे.नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूरमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी विचारात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ३३ व ६५ अन्वये नळदुर्गमार्गे तुळजापूरकडे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी नळदुर्ग रोड येथील तालुका क्रीडा संकुल अधिग्रहित करण्यात आले आहे.महोत्सवाच्या काळात भाविकांना तसेच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहावी,हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. तहसीलदार तुळजापूर यांनी या ठिकाणी स्वतंत्र पथक तैनात करावे,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी,नगर परिषद तुळजापूर यांनी तालुका क्रीडा संकुलाच्या ठिकाणी पार्किंगची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार तुळजापूर,पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांच्याशी समन्वय साधून सर्व आवश्यक कार्यवाही करावी.

तालुका क्रीडा संकुल मैदानावर वाहनांना प्रवेश करण्यासाठी व मैदानातून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.त्यासाठी संबंधित ठिकाणी आणखी एक गेट तयार करून पार्किंगमध्ये येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांची स्वतंत्र व्यवस्था करावी,असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवात लाखो भाविकांची पावले तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे वळतात.अशा वेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा प्रवास वाहनांच्या कोंडीत अडकू नये आणि शहरातील वाहतुकीवरील ताण कमी व्हावा,यासाठी क्रीडा संकुलाचा पार्किंगसाठी उपयोग करण्याचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

  • Related Posts

    मंचकी निद्रेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेने प्रारंभ झाला. सायंकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर…

    टंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल विभागाचे निर्देश

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्र भूजल अधिनियमाच्या कलमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना धाराशिव – खरीप हंगाम २०२६ मधील पहिल्या कळेत दुष्काळी परिस्थिती घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा विचार करता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *