दिवाळीसाठी तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्जाचे आवाहन

Spread the love

७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारणार

धाराशिव – दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल उभारण्यासाठी आवश्यक परवानगीचे अर्ज ७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज.
फॉर्म LE-५.ओळखपत्र — आधार कार्ड, पॅनकार्ड,मतदान ओळखपत्र इत्यादी.संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र. संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचा साक्षांकित नकाशा. संबंधित जागा खासगी असल्यास जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र व जागेची कागदपत्रे.संबंधित पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र.विहित परवाना शुल्काचा भरणा केल्याचे चलन. इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण असलेले प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जातील. तसेच,विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.त्यामुळे तात्पुरते फटाके विक्री स्टॉल सुरू करण्यास इच्छुक अर्जदारांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा व तालुका यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

    Spread the love

    Spread the loveदुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा…

    सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ ऑक्टोबरला सायकल व ई-बाईक रॅली

    Spread the love

    Spread the loveनागरिकांना सहभागाचे आवाहन धाराशिव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *