जिल्हा कोषागार कार्यालयात ६ ऑक्टोबर रोजी ‘महा- उपलब्धी’ ॲपची विशेष कार्यशाळा

Spread the love

निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या डिजिटल सेवा ; जिल्हा कोषागार कार्यालयात मिळणार ॲप वापराचे मार्गदर्शन

धाराशिव – राज्यातील सेवानिवृत्त आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन जिल्हा कोषागार कार्यालय, धाराशिव येथे सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या वित्त विभागाने पेन्शनधारकांची गैरसोय टाळून त्यांना अधिक जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १ जुलै २०२६ पासून ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप सुरू केले आहे.

या आधुनिक सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी हयातनामा सादर करण्यासाठी किंवा आयकरविषयक फॉर्म १६ मिळविण्यासाठी कोषागार कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. मोबाईल प्रणालीवर हे ॲप उपलब्ध असल्याने ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाचणार आहेत.

या नवीन ॲपच्या वापराबाबत पेन्शनधारकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी तसेच तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात,या उद्देशाने वित्त विभागाच्या सूचनेनुसार राज्यभरात एकाच दिवशी आभासी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत वित्त विभागाचे प्रधान सचिव स्वतः ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून सेवानिवृत्त वेतनधारकांना थेट मार्गदर्शन करणार आहेत.तसेच ‘महा-उपलब्धी’ ॲप हाताळताना येणाऱ्या अडचणींचे निरसनही या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त वेतनधारकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती.अर्चना नरवडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    दुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा व तालुका यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

    Spread the love

    Spread the loveदुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा…

    सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ ऑक्टोबरला सायकल व ई-बाईक रॅली

    Spread the love

    Spread the loveनागरिकांना सहभागाचे आवाहन धाराशिव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *