धाराशिवच्या शिरपेचात मानाचा तुरा! १२ तासांत सर्वाधिक मियावाकी वृक्षलागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Spread the love

धाराशिवच्या शिरपेचात मानाचा तुरा! १२ तासांत सर्वाधिक मियावाकी वृक्षलागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

धाराशिव : पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याने देशाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून १४ ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात १२ तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या सर्वाधिक मियावाकी पद्धतीच्या वृक्षलागवडीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

या ऐतिहासिक कामगिरीची अधिकृत दखल घेत Guinness World Records कडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून, त्यावर “The largest Miyawaki plantation in 12 hours (multiple venues)” अशी विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन, विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी-कर्मचारी, इको किसान सामाजिक संस्था धाराशिव,स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या सामूहिक सहभागातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी झाला. एकाच वेळी अनेक ठिकाणी मियावाकी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

धाराशिवच्या मातीत रुजलेली ही रोपे आता केवळ झाडे नसून, भावी पिढीसाठी निर्माण केलेली हिरवी संपत्ती आहेत. जागतिक विक्रमाचे हे प्रमाणपत्र धाराशिवच्या पर्यावरणपूरक वाटचालीची ऐतिहासिक साक्ष ठरणार आहे.

🌱 धाराशिवचा विक्रम… पर्यावरणाचा संकल्प!
🇮🇳 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुळे धाराशिवच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा!

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *