

धाराशिव :- गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरात झाले,मल्टी पर्पज जिल्हा परिषद कन्या शाळेतील पटांगणात मुक्काम असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव यांच्या वतीने रक्तदान शिबीर तर जिल्हा शासकीय आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव यांच्या कडुन आरोग्य शिबीर आणि धाराशिव सेवक फाऊंडेशन,आस्था स्कुल ऑफ नर्सिंग धाराशिवच्या वतीने बिपी शुगर तपासणी करून प्राथमिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते करण्यात येऊन रक्तदात्यांचा सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी सदस्य,सुरक्षा समिती,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवचे तथा अध्यक्ष,फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे,धाराशिव सेवक विवेक यादव,प्राचार्या स्टेला दलभंजन प्रा.आशा थोरात, डॉ.विवेक कोळगे,डॉ.प्रविण डुमणे,डॉ.प्रफुल्र धाबेकर, डॉ.गोविंद पाकले,डॉ.अनिल पाटील,नगराध्यक्षा नेहाताई काकडे,नगर सेविका आडसुळ ताई,नगर सेवक अमित भैया शिंदे,नगर सेवक अय्याज भाई शेख,नगरसेवक पंकज भोसले,शेखर घोडके,एजाज काझी,रोहित बागल, मिलिंद पेठे,अर्चना अंबुरे,ज्योती माळाळे,तसेच रक्त संक्रमण अधिकारी डॉ विशाल नारायणगावकर,नर्सिंग ऑफिसर नामदेव मुंडे.जनसंपर्क अधिकारी गणेश साळुंके,रक्त केंद्र तंत्रज्ञ विष्णू गलांडे,रक्त केंद्र तंत्रज्ञ अविनाश रणखांब, रक्त केंद्र परिचर जाकेर शेख सह इतर मान्यवर उपस्थित होते तर रक्त संक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी, धाराशिव सेवक फाऊंडेशन,आस्था स्कुल ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी, पदाधिकारी उपस्थित होते.