जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न

Spread the love

धाराशिव – दिनांक १० जून रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय धाराशिव व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था,छत्रपती संभाजीनगर,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक धाराशिव डॉ.धनंजय चाकुरकर,निवासी वैद्यकीय बाह्य संपर्क अधिकारी धाराशिव डॉ.शिवाजी फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आला.या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडळकर यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वाक्षरी अभियानमध्ये सहभाग नोंदविला.

१० जून रोजी तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे शहर पोलीस स्टेशन परिसरातील, सावरकर चौक,काळा मारुती चौक, अंबाला चौक तसेच बार्शी नाका चौक अशा एकूण १२ ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण (कोटपा) २००३ या कायद्याअंतर्गत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.यावेळी डॉ.विक्रांत राठौर जिल्हा सल्लागार, डॉ.धुमाळ,दंत शल्यचिकित्सक , अनिल गुंज,प्रतिनिधी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था,प्रदीप तटाळे समुपदेशक,नर्सिंग ऑफिसर श्रीनिवास निर्मळ यांच्या सहाय्याने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा –२००३ (कोटपा) या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली.

अशा प्रकारची मोहीम नियमित संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार आहे – कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासाठी मनाई आहे,कलम ५ नुसार तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे,कलम ६ अ नुसार १८ वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये. विक्रेत्याने तसा फलक आपल्या दुकानात लावणे बंधनकारक आहे, कलम ६ ब नुसार शाळा, महाविद्यालय परिसरात १०० यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे,कलम ७ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे लेबलवर ८५ टक्के भागात चित्रमय इशारा आणि वैधानिक इशारा छापणे बंधनकारक आहे. खुली चित्रमय इशारा नसलेली सिगारेट विकण्यास मनाई आहे.

  • Related Posts

    तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि…

    नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *