दृष्टीदानाचा संकल्पच अंधत्व निर्मूलनाचा प्रभावी मार्ग ; दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात

Spread the love

धाराशिव – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रविभाग,जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव येथे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० ते १६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन आज १० जून रोजी बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाले.यावेळी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून अंधत्व निर्मूलनासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,नेत्रविभाग प्रमुख डॉ.महेश पाटील, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.ज्योती कानडे,डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ.सायली कोकाटे,डॉ.पवन महाजन, अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे,रामराजे बिडवे,श्रीकांत कल्याणी तसेच नेत्रविभागातील सर्व अधिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.महेश पाटील यांनी दृष्टी दिनाचे महत्त्व विषद करताना डॉ. भालचंद्र यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व आधुनिक सुविधा उपलब्ध नसतानाही सामाजिक बांधिलकी जपत अंधत्व निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.हजारो नागरिकांना दृष्टीदान मिळवून देणाऱ्या त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच डोळ्यांचे विविध आजार, त्यांची लक्षणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ.सायली कोकाटे यांनी उपस्थित रुग्ण,त्यांचे नातेवाईक तसेच अधिकारी-कर्मचारी यांना मरणोत्तर नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले. नेत्रदान कोण करू शकते,मृत्यूनंतर किती वेळेत नेत्रदान करता येते तसेच नेत्रदानाबाबत समाजात असलेले विविध गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी सविस्तर माहिती दिली.प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा,असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी डॉ.भालचंद्र यांनी नेत्रशस्त्रक्रिया क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. पूर्वीच्या तुलनेत सध्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उपचार अधिक सुरक्षित व सोयीस्कर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने नेत्रदानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

दृष्टी दिन सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण २० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. महेश पाटील यांनी केले.

  • Related Posts

    तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि…

    नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *