
धाराशिव :- 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.15 ऑगस्ट रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालय पतसंस्था यांनी सुरक्षा समितीच्या विनंतीला मान देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी सिमेंटच्या बाकड्याची व्यवस्था केली त्याबद्दल पतसंस्थेच्या पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले,80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर केले, सेवानिवृत्त

लेफ्टनंट कर्नल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला,तर वैद्यकीय पतसंस्थेंचे पदाधिकारी व डॉ.बाळासाहेब घाडगे, एस एच फंड व त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षा समितीच्या वतीने आभार पत्र देण्यात आले, ध्वजारोहण व आभार पत्र यावेळी डॉ.शफिक अहमद मुंढेवार,डॉ.प्रविण डुमणे,डॉ.स्वाती पाढरे,सुरक्षा समिती सचिव तथा अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ तानाजी लाकाळ,मेट्रन सुमित्रा गोरे,सदस्य अब्दुल

लतीफ,सदस्य गणेश वाघमारे,सदस्य मेजर जावळे,आरोग्य मित्र शेख रौफ ब्रदर,श्री बाळासाहेब मुरकुटे, डॉ.नितिन भोसले, डॉ.प्रफुल्ल धाबेकर,डॉ.सोनटक्के,सहा.मेट्रन शेळे मॅडम, श्री दिलीप,सह इतर उपस्थित होते.