श्री आई तुळजाभवानी मंदिर येथे दिव्यांग व अतिवृद्ध भाविकांसाठी मोफत डेली व खुर्ची सेवा

Spread the love

तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे दर्शनासाठी चालत जाण्यास अडचण असलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच अतिवृद्ध भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासकीय कार्यालया येथून मोफत डोली व खुर्ची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दर्शनासाठी पायी चालणे शक्य नसलेल्या किंवा अडचण येणाऱ्या भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. ही सेवा मंदिर संस्थानामार्फत पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार भाविकांना योग्य मार्गदर्शन व सहाय्यही करण्यात येत आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिर प्रशासकीय कार्यालयाशी अथवा मंदिर कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. तेथून आवश्यकतेनुसार डोली अथवा खुर्चीची व्यवस्था करून संबंधित भाविकांना दर्शनासाठी सहाय्य करण्यात येत आहे.
श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर हे प्रत्येक भाविकाला सुरक्षित, सुलभ व सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी सातत्याने विविध सुविधा उपलब्ध करून देत असून, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक भाविकांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

  • Related Posts

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

    Spread the love

    Spread the loveपाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *