नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

Spread the love

धाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी धाराशिव शहरातून नेत्रदान जनजागरण रॅली काढण्यात आली. घोषवाक्ये आणि जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून नेत्रदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ४१ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्त या नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीच्या प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी हिरवा झेंडा दाखविला.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,धाराशिव येथून रॅलीला सुरुवात झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर,मारवाडी गल्ली,काळा मारुती चौक, सावरकर चौक आणि त्रिशरण चौकमार्गे रॅली पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात पोहोचली.तेथे रॅलीची सांगता करण्यात आली.

या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव रोटेरियन प्रवीण काळे,जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्ररुग्णालयाचे अतुल देशमुख, शिवरुद्र इसाके,जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील,डॉ.एम.के.पल्ला, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ.ज्योती कानडे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवी सुरवसे तसेच रुग्णालयातील कर्मचारी प्रदीप तटाळे आणि श्रीनिवास निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.रॅलीमध्ये धाराशिव शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र,के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग आणि सह्याद्री नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांच्या हातातील नेत्रदानविषयी संदेश देणारे फलक आणि घोषवाक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून नेत्रदानाविषयी समाजात व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नेत्रदानाबाबत जनजागृतीचा जागर
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील कर्मचारी प्रदीप तटाळे,श्रीनिवास निर्मळ,उमेश गोरे,रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय, धाराशिव यांच्या वतीने या नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.

  • Related Posts

    तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरात झाले,मल्टी पर्पज जिल्हा परिषद कन्या शाळेतील पटांगणात मुक्काम असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव यांच्या वतीने रक्तदान शिबीर तर जिल्हा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *