फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सवात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

Spread the love

धाराशिव :- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असुन आज रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले, विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांचा नारी सन्मान करण्यात आला, शैक्षणिक क्षेत्रातील यशराज पब्लिक स्कूल शाळेच्या प्रिन्सिपॉल रेखाताई जेवळीकर,आरोग्य क्षेत्रातील मेट्रन सुमित्रा गोरे,मेट्रन रिबेका भंडारी, इन्चार्ज मेट्रन भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे, मातोश्री वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका अनुजा पानसरे,ॲड.अश्विनी सोनटक्के, राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला शिंदे,सौ विद्याताई जगताप,तेजल गजधने सह इतर महिला भगिनींना शाल व रोप देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश वाघमारे,सचिव प्रवीण जगताप, उपाध्यक्ष संजय गजधने,मार्गदर्शक बलभीम कांबळे,धनंजय वाघमारे, बाबासाहेब बनसोडे,संपतराव शिंदे,अंकुश उबाळे, किसन घरबुडवे,बाबासाहेब गुळीग,स्वराज जानराव,अतुल लष्करे,विशाल घरबुडवे,अब्दुल लतीफ,शेख रौफ,छत्रपाल वाघमारे,सोहन बनसोडे,राजेंद्र धावारे, रमेश पाटील,महेश उपासे,शशी माने,विशाल सरवदे,अजय चिलवंत, सिद्राम वाघमारे, सुत्रसंचलन बलभीम कांबळे यांनी तर आभार धनंजय वाघमारे यांनी मानले.दि.१२ एप्रिल रोजी भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती केलेल्या व्याख्याते व गुणवंतांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील सह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी केले.

  • Related Posts

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *