मुंबईला पहिली महिला आयुक्त; अश्विनी भिडे यांची ऐतिहासिक नियुक्ती

Spread the love

मुंबई : अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने प्रशासन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या नियुक्तीमुळे त्या मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांमध्ये अश्विनी भिडे यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. विशेषतः मुंबई शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात त्यांच्या कार्याची नोंद घेण्यात आली आहे.
अश्विनी भिडे यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असून शहराच्या गरजांची सखोल जाण त्यांना आहे. त्यांच्या नेतृत्वात मुंबईचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांची नियुक्ती ही मुंबईच्या विकासाला ‘ग्रीन सिग्नल’ मानली जात असून भविष्यातील प्रकल्पांना नवे बळ मिळणार आहे.
शहराच्या वाढत्या गरजांनुसार सक्षम, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उभारण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित मुंबई’चा संकल्प निश्चितच साकार होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
अश्विनी भिडे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *