धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज.

असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी इंजि. राहुल गवळी, उपाध्यक्षपदी इंजि. दशरथ धुमाळ (आर्किटेक्ट), सचिवपदी इंजि. प्रदीप रोंगे, सहसचिवपदी इंजि. पंकज स्वामी आणि कोषाध्यक्षपदी इंजि. नितीन विधाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच ज्येष्ठ आर्किटेक्ट्स आणि सिव्हिल इंजिनिअर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वानुमते निवड केल्याबद्दल सर्व सदस्य, पदाधिकारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पणाने कार्य करेन. सर्व पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन आर्किटेक्ट्स आणि सिव्हिल इंजिनिअर्स यांच्या व्यावसायिक, तांत्रिक व प्रशासकीय प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून संघटनेला अधिक सक्षम, मजबूत आणि प्रगतिशील बनविण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने संघटनेला नव्या उंचीवर नेण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया गवळी यांनी दिली.