धाराशिव जिल्ह्याला मिळाली कर्तव्यदक्ष नेतृत्वाची साथ!श्रीमती प्रियंवदा महाडदळकर यांची जिल्हा परिषद CEO पदी नियुक्ती…

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी….

धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून, श्रीमती प्रियंवदा महाडदळकर यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर बदली झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनाला सक्षम, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व लाभले आहे.
2022 साली UPSC Civil Services Examination मध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावत आणि देशात तेरावा क्रमांक मिळवत त्यांनी घवघवीत यश संपादन केले होते. त्यांच्या या यशामुळे त्या राज्यभरात चर्चेत आल्या होत्या.
प्रशासकीय कामकाजात अचूक निर्णयक्षमता, धाडसी भूमिका आणि लोकाभिमुख दृष्टीकोन यामुळे प्रियंवदा महाडदळकर यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी आतापर्यंत विविध पदांवर काम करताना पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य दिले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सक्षम करणे आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

“तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व”
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रियंवदा महाडदळकर या प्रेरणास्थान ठरत आहेत. कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या जोरावर त्यांनी मिळवलेले यश अनेकांना दिशा देणारे आहे.

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *