शिवसेनेच्या जिल्हा संघटन प्रमुखपदी सुवर्णा पाटील

Spread the love

लोहारा  (प्रतिनिधी) – शिवसेनेचा जिल्ह्यात विस्तार वाढविण्यासाठी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा सतीशराव पाटील यांची शिवसेना महिला सेना जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुवर्णा पाटील यांचे कार्य तळागाळातील नागरिकापर्यंत असून त्या प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदतीसाठी धावून जातात. त्यांच्या संघटन बांधणीच्या कौशल्यामुळे लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी संघटन बांधून तालुक्यात मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण संघटन बांधणीमुळे लोहारा तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बांधणी गाव स्तरापासून तालुकास्तरापर्यंत अतिशय मजबूत झालेली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीवेळी त्यांना पक्षश्रेष्ठींनी संधी दिली जाईल अशी आश्वासन दिले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना संधी दिली नसली तरी त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. उलट, अधिक नव्या जोमाने त्या पक्षाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत झालेल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार शिवसेनेचे कार्य युवक, युवती, महिला, पुरुष व शेतकरी यांच्यासह तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या खांद्यावर जिल्हा संघटन प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीचे पत्र पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेनेचे धाराशिव लोकसभा प्रमुख आनंद पाटील, सतीश पाटील यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

….

पक्षप्रमुख शिंदे व पालकमंत्री सरनाईक यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घराघरांत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. तर बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून संपूर्ण जिल्ह्यात महिला संघटन अधिक मजबूत करु. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा अधिक ताकदीने फडकविणार असल्याचे आश्वासन सुवर्णा पाटील यांनी दिले.

  • Related Posts

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    मुंबईला पहिली महिला आयुक्त; अश्विनी भिडे यांची ऐतिहासिक नियुक्ती

    Spread the love

    Spread the loveमुंबई : अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने प्रशासन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या नियुक्तीमुळे त्या मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या असून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *