संभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती…

Spread the love

संभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती…

धाराशिव (प्रतिनिधी )सामाजिक व संघटनात्मक पातळीवर कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आजवरच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष आकाश मुंडे व सतीश पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन मनोज मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच ब्रिगेडची कार्यप्रणाली, संघटन रचना आणि विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सामाजिक कार्याची दखल
मनोज मोरे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांना संघटित करणे, सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे आणि जनतेच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणे या त्यांच्या कार्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
“वरिष्ठांचा आदेश मान्य, विचार जनतेपर्यंत पोहोचवणार”
नियुक्तीनंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मनोज मोरे म्हणाले,
“संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत केलेल्या कार्याला कोणत्याही प्रकारचा डाग लागू न देता, वरिष्ठांनी दिलेला प्रत्येक आदेश मान्य करून मी संघटनेचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.”
त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनेची ताकद अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *