शाकंभरी नवरात्र व नाताळ सणानिमित्त तुळजाभवानी मंदिरात दर्शन व्यवस्थेत बदल

Spread the love

तुळजापूर | (प्रतिनिधी) – श्री आई तुळजाभवानी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सव 2025 तसेच ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत.
भाविकांचे दर्शन सुलभ व सुव्यवस्थित व्हावे यासाठी दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1.00 वाजेपासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपात प्रवेश देण्यात येणार आहे.
तसेच 25 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत रु. 200 सामान्य पास आणि रु. 200 रेफरल पास बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, रु. 500 स्पेशल देणगी दर्शन पास घेणाऱ्या भाविकांना प्रशासकीय कार्यालयाच्या तळमजल्यातून पास वितरित करण्यात येतील.
या कालावधीत रु. 500 पासधारक तसेच सिंहासन/अभिषेक पूजा पासधारक भाविकांना राजे शहाजी महाव्दार मार्गे मंदिरात प्रवेश देऊन देवी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी केले आहे.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *