गाड्या-घोडे देतोय, पण कोयता गँग रस्त्यावर नको!उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पोलिसांना थेट इशारा

Spread the love

पुणे : राज्यात वाढत चाललेल्या कोयता गँगच्या दहशतीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले. “गाड्या देतोय, घोडे देतोय; पण रस्त्यावर कोयता गँग दिसता कामा नये,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

पोलिस दलाला आवश्यक ती वाहने, साधनसामग्री आणि मनुष्यबळ शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानंतरही जर दहशत माजवणाऱ्या टोळ्या, शस्त्रसज्ज तरुणांचे गट रस्त्यावर फिरत असतील, तर ते कायद्याच्या अंमलबजावणीत झालेलं अपयश मानलं जाईल, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, टोळक्यांद्वारे दहशत निर्माण करणे किंवा कायदा हातात घेणाऱ्यांवर कसलाही दबाव न घेता कठोर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा कडक संदेश या वक्तव्यातून देण्यात आला आहे.

राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी शून्य सहनशीलतेची भूमिका घ्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *