धाराशिव :- जिल्हा ऍथलेटिक्स संघटना व श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयच्या वतीने जिल्हा क्रॉस-कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 23 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हि स्पर्धा श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे होणार आहे. यामध्ये 16 व 18 वर्षाखालील पहिल्या 02 तसेच 20 वर्ष व खुला गटातील पहिल्या 6 पात्रता धारण करणाऱ्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड होणार आहे.
एकूण 04 वयोगटात हि स्पर्धा होणार आहे. राज्य स्पर्धेकरिता 16 वर्ष मुले/मुली 2km धावणे,18 वर्ष मुली 4km धावणे,18 वर्ष मुले व 20 वर्ष मुली 6km धावणे,20 वर्ष मुले 8km धावणे, खुला महिला – पुरुष 10km धावणे या प्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेत प्रवेश करताना ओळखपत्र, आधारकार्डसह ग्रामपंचायत,नगरपरिषद,नगरपालिका यांच्याद्वारे जारी करण्यात आलेला जन्म तारखेचा दाखला तसेच AFI UID असणे अनिवार्य आहे.स्पर्धेत सहभागी होनाऱ्या खेळाडूंची जन्म तारीख
20 वर्ष वयोगट 25/01/2006 ते 24/01/2008,
18 वर्ष वयोगट 25/01/2008 ते 24/01/2010,
16 वर्ष वयोगट 25/01/2010 ते 24/01/2012 या प्रमाणे असावी. जिल्हा संघ निवड समिती प्रमुख राजेंद्र सोलनकर,राजेश बिलकुले,माउली भुतेकर तर तांत्रिक समिती मध्ये रोहित सुरवसे,सचिन पाटील,सुरेंद्र वाले,अजिंक्य वराळे,मुनीर शेख,चांद शेख,प्रशांत बोराडे,अश्विन पवार आणि बक्षीस वितरण मध्ये संजय कोथळीकर, ऋषिकेश काळे इत्यादी आहेत. दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता तुळजापूर येथील तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे सचिव श्री.योगेश थोरबोले यांनी दिली. या जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत आदिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री भरत जगताप यांनी केले आहे अधिक माहितीसाठी राजेश बिलकुले(8329847952),राहुल जाधव(9423342490),रोहित सुरवसे(77967 56866),योगेश थोरबोले यांच्याशी संपर्क साधावा.
कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास
Spread the loveधाराशिव – जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश…