कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास

Spread the love

धाराशिव – जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे.चेतनचे शालेय शिक्षण पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशाला, एकात्मिक विशेष युनिट येथे झाले.त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इयत्ता ११ वी ते एम.कॉमपर्यंत शिक्षण घेत त्याने ७३ टक्के गुणांसह ‘ए’ श्रेणीत उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे,कर्णबधिर असूनही त्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण पूर्ण केले.क्रीडा क्षेत्रातील त्याचा प्रवास सुरुवातीला बॅडमिंटनपासून झाला.

शालेय स्तरावर राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकणारा चेतन कोरोनाकाळात गावाकडे परतल्यानंतरही स्वस्थ बसला नाही. इंटरनेटच्या माध्यमातून त्याने पिस्तोल नेमबाजीची माहिती घेतली आणि धाराशिवमधील प्रशिक्षक अजिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला.२०१८ साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्याच्या पालकांनी घरच्या मोकळ्या जागेत १० मीटरची नेमबाजी रेंज उभारली आणि तेथूनच त्याच्या यशस्वी प्रवासाची खरी सुरुवात झाली.
गेल्या आठ वर्षांत चेतनने जिल्हा, राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.सप्टेंबर २०२४ मध्ये जर्मनी येथे झालेल्या जागतिक डेफ नेमबाजी स्पर्धेत त्याने दोन कांस्य आणि एक रौप्य पदक पटकावले. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये टोकियो येथे झालेल्या २५ व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवत देशाचा गौरव वाढवला.आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने एकूण चार पदके जिंकली आहेत.

राष्ट्रीय पातळीवरही त्याची कामगिरी तितकीच उज्वल आहे.विविध स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण,सात रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण १४ पदके त्याच्या नावावर आहेत.राज्य स्तरावरही त्याने आपली छाप सोडली आहे.याशिवाय २०१६-१७ मध्ये दिव्यांग क्रीडा पुरस्कार आणि २०२२-२३ मध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळवणारा तो धाराशिव जिल्ह्यातील पहिला दिव्यांग नेमबाज ठरला आहे.

चेतनच्या यशामागे त्याची आई सौ. सविता सपकाळ यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.गेली वीस वर्षे त्यांनी त्याच्या शिक्षणापासून ते क्रीडा प्रशिक्षण,आहार आणि स्पर्धांपर्यंत प्रत्येक बाबतीत अथक परिश्रम घेतले.

  • Related Posts

    मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र२० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी अॅथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता…

    राज्य क्रीडा दिनानिमित्त,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : १५ जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दिवंगत ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *