मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र२० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

धाराशिव – राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी अॅथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या केंद्रासाठी पात्र खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या विभागीय क्रीडा निपुणता केंद्राअंतर्गत अँथलेटिक्स व कुस्ती या खेळांसाठी प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.इच्छुक व पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा,लातूर विभाग,जिल्हा क्रीडा संकुल परिसर,औसा रोड,लातूर येथे प्रत्यक्ष सादर करावेत किंवा dyd.syslatur@rediffmail.com या ई-मेलवर दिनांक २० मार्च २०२६ पर्यंत पाठवावेत.

या निवडीसाठी अर्जदार खेळाडूंची वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२६ रोजी २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.तसेच अर्जासोबत जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,आधार कार्ड,मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे,पासपोर्ट साईजचे तीन फोटो,शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

अर्ज करणारा खेळाडू महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.क्रीडा कामगिरीच्या निकषानुसार राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये (SGFI,AFI, Khelo India National) सहभागी झालेले खेळाडू पात्र राहतील.मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार असून क्रीडा कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती (फिटनेस) चाचण्यांमध्ये पात्र ठरणे आवश्यक राहील.याशिवाय शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणेही अनिवार्य आहे.

मिशन लक्ष्यवेध या योजनेअंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना निवासी क्रीडा प्रशिक्षण,आवश्यक पायाभूत सुविधा,क्रीडा साहित्य,सराव व मूल्यमापनासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन, स्पोर्ट्स सायन्स सेंटरची सुविधा,करिअर मार्गदर्शन तसेच देशी-विदेशी संस्थांच्या सहकार्याने क्षमता विकास कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय निवास,भोजन,पूरक आहार, क्रीडा व प्रशिक्षण साहित्य,देशांतर्गत व परदेशातील प्रशिक्षण तसेच स्पर्धांमध्ये सहभागासाठीचा खर्च,वैद्यकीय तपासण्या आणि किरकोळ वैद्यकीय खर्च याची सोय विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा,लातूर विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मिशन लक्ष्यवेध या योजनेअंतर्गत प्रवेशासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी अर्ज करावा,तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

  • Related Posts

    कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश…

    राज्य क्रीडा दिनानिमित्त,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : १५ जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दिवंगत ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *