१२ ते १८ डिसेंबरदरम्यान क्रीडा सप्ताह ; विविध क्रीडा स्पर्धां

Spread the love

धाराशिव – राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना होऊन जनतेमध्ये क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरावर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार १२ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे.त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे स्केटिंग व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे कराटे स्पर्धा तसेच सायंकाळी ५ वाजता गांधी विद्यालय, चिखली,ता.जि.धाराशिव येथे कबड्डी स्पर्धा होणार आहे.१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

१५ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे १०० मीटर,२०० मीटर धावणे व चालणे स्पर्धा तसेच सकाळी १० वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आर्चरी स्पर्धा होणार आहे.१६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तालुका क्रीडा संकुल,कळंब येथे आट्या-पाट्या स्पर्धा तर सायंकाळी ६ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

१७ डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे सकाळी ९ वाजता तलवारबाजी स्पर्धा तसेच सायंकाळी ५ वाजता जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.१८ डिसेंबर रोजी क्रीडा सप्ताहाचा समारोप सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे होणार आहे.

या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.तसेच जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *