
धाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या कडुन ज्येष्ठ नागरिक यांच्या बिपी,शुगर तपासणीचा उपक्रमात रक्तदान शिबीराचे देखील आयोजन केले होते,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नायाब तहसिलदार महादेव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ७५ ज्येष्ठ नागरिकांनी बिपी शुगर तपासणी

केली,विशेष म्हणजे मुली,महिला व तरुणांनी रक्तदान केले,रक्तदात्यांचा सन्मान प्रमाणपत्र व पोलीस भरती पुर्व तयारीचे पुस्तक देऊन प्रमुख पाहुणे नायाब तहसिलदार महादेव शिंदे,नगरसेवक नाना घाडगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला,समता नगर भागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी बिपी शुगर तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करुन प्रभागातील नागरिकांचे आरोग्य हित जोपासले याबाबत

ज्येष्ठ नागरिकांनी नगर सेवक नाना घाटगे यांचे कौतुक केले, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नायाब तहसिलदार महादेव शिंदे,ज्येष्ठ नागरिक अंकुश उबाळे,सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे,रामचंद्र जोशी,बिभिषण माळी,श्री टेकाळे,खिचडे,हरीदास लोमटे,बण्टी कादरी,महेश काटे, मनसुर काझी,आकाश लष्करे, शैलेश काळे,रोहीत घाटगे,राजेंद्र धावारे,पुरातत्त्वज्ञ इतिहासकार रविंद्र शिंदे,आदर्श शिक्षक बलभीम कांबळे,मोहन शिंदे,श्री.नायगावकर,कैलास पानसे,श्री बनसोडे सह इतर उपस्थित होते,नगर सेवक नाना घाटगे यांनी कार्यक्रमाची माहिती देऊन आभार मानले.