मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज.

मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार,दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभास सकाळी ८.४५ वाजता पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे.मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला यावेळी अभिवादन करण्यात येईल.

परिवहन मंत्री तथा पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिवच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता होणार आहे.

मराठवाड्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला लढा, केलेला त्याग आणि हुतात्म्यांचे बलिदान यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा दिवस आहे. या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने आयोजित स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण कार्यक्रम तसेच मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला; आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून काम करण्याची वेळ — पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण केल्या; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आंदोलना ऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया, असे आवाहन* धाराशिव – : धाराशिवचे पालकमंत्री म्हणून…

    मराठा समाजावर उपकार कोणते?

    Spread the love

    Spread the loveशेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची घोषणा; पण दुष्काळात बांधावर गेले कुठे? भगवा ध्वज आणि समाज मंदिराचा मुद्दा ‘उपकार’ म्हणून मांडण्यावर मराठा समाजातून सवाल; शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा धाराशिव -: काल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *