सैराट’ फेम सुप्रसिद्ध संगीतकार अजय गोगावले तुळजाभवानी चरणी नतमस्तक; सहकुटुंब घेतले देवीचे दर्शन

Spread the love

तुळजापूर -: भारतीय संगीत विश्वावर आपल्या स्वरांनी आणि संगीताने अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध जोडी ‘अजय-अतुल’ यांतील संगीतकार व गायक अजय गोगावले यांनी आज (दि. ७) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

​अजय गोगावले यांनी आज सहकुटुंब तुळजापूर येथे येऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या परंपरेनुसार देवीचे कुलधर्म व कुलाचार पार पाडले. त्यांनी आई तुळजाभवानीची मनाभावे ओटी भरून आरती केली.

​दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी अजय गोगावले यांना देवीची प्रतिमा आणि महावस्त्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, दिनेश निकवाडे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर आणि मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    येडशी येथे 13 ऑगस्टपासून श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान यात्रेस प्रारंभ

    Spread the love

    Spread the love‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंग परिसरात महिनाभर भक्तांची मांदियाळी; पर्यटकांसाठी विविध आकर्षणे सज्ज येडशी – धाराशिव तालुक्यातील येडशीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र रामलिंग…

    श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन जनजागृती उपक्रमांचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : पर्यटन जनजागृती संस्था, धाराशिव संचलित पर्यटन विकास समिती,धाराशिव तसेच सकल विरशैव लिंगायत समाज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *