मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोनचा थरार! ठाकरे गटाचा आरोप — “नजर ठेवली जातेय…”

Spread the love

मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर अज्ञात ड्रोन फिरताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचा आरोप आहे की, या ड्रोनच्या माध्यमातून “मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न” करण्यात येत आहे.

दरम्यान, एम.एम.आर.डी.ए. (M.M.R.D.A.) ने या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,

“हा ड्रोन पॉडटॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा भाग होता आणि यासाठी मुंबई पोलिसांची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती.”

मात्र, हे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी फेटाळले असून त्यांनी स्पष्ट शब्दांत विचारलं —

“जर परवानगी होती, तर मातोश्रीजवळ का? घरांमध्ये डोकावून सर्वेक्षण करायचं का?”

सध्या उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मातोश्री व एम.एम.आर.डी.ए. कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर हा ड्रोन दिसला. सुरक्षारक्षकांनी तातडीने त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला, आणि काही वेळातच तो व्हायरल झाला.

या घटनेनंतर मातोश्री परिसरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.

  • Related Posts

    निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा; गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

    Spread the love

    Spread the love१९७८ पासूनचा संघर्ष, संघटन आणि पक्षनिष्ठेचा इतिहास मांडत गुंड कुटुंबाची भूमिका; “निष्ठा शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते” धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास…

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *