सोलापूर महानगरपालिकेकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरण काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

Spread the love

सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण योजना सन २०२२-२३ अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम ठेकेदार श्री. सुरज दादासाहेब शिंदे (रा. दिघी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या नावे मंजूर करण्यात आले आहे.

या कामाची वर्कऑर्डर दिनांक ०४/०३/२०२४ रोजी देण्यात आली असून, ठरविलेल्या अटींनुसार कामाची मुदत ६ महिने निश्चित करण्यात आली होती. तथापि, या कालावधीत काम समाधानकारकरीत्या पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले. दिनांक २९/०५/२०२५ रोजी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत काम बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतरही काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे संबंधित ठेकेदारास नोटीस क्र.०१ व क्र.०२ देण्यात आल्या असून, काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले होते.

दरम्यान, दिनांक १४/१०/२०२५ रोजी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी यांनी स्वतः साइटला भेट देऊन पाहणी केली असता, कामाची गती अत्यंत मंद असल्याचे त्यांनी नोंदविले व हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींकडूनही या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

सदर परिस्थितीचा विचार करता सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास तातडीने युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे काम दि. १०/०१/२०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ठरविलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास टेंडरमधील अटी व शर्तींनुसार कारवाई करण्यात येईल तसेच प्रती दिन रु. १०,०००/- दंड आकारण्यात येईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मक्तेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांना मक्तेदारातून ब्लॅकलिस्टमध्ये कायमस्वरूपी टाकण्यात येईल. व कुठल्याच निविदा प्रक्रियेमध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही.

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या संदर्भात सांगितले की, “श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम हे शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीशी निगडीत महत्त्वाचे प्रकल्प आहे. या कामात होणारा विलंब नागरिकांना अस्वस्थ करणारा असून, संबंधित ठेकेदाराने तातडीने काम पूर्ण करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल.”

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेवर आणि वेळेत पूर्णतेवर भर देत, नागरिकांना उत्तम दर्जाचे आणि आकर्षक सार्वजनिक ठिकाण उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *