‘अथक परिश्रमातून’ साकारले देवीचे सुंदर चित्र; अकोल्याच्या पिंपळे दाम्पत्याची श्री तुळजाभवानी चरणी अनोखी सेवा

Spread the love

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक आपापल्या परीने देवीच्या चरणी सेवा अर्पण करत असतो. अशीच एक अमूल्य आणि कलात्मक सेवा अकोला येथील एका भाविक दाम्पत्याने देवीच्या चरणी रुजू केली आहे. अकोला येथील रहिवासी श्री. सतीश पिंपळे व त्यांच्या पत्नी सौ. पद्मा पिंपळे यांनी अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमातून श्री तुळजाभवानी देवीचे अतिशय सुंदर असे चित्र रेखाटले.

या चित्राला सुबक फ्रेम करून पिंपळे दाम्पत्याने ते चित्र श्री तुळजाभवानी देवीजींच्या चरणी सादर केले आणि आपला सेवा भाव अर्पण केला. त्यांच्या या भक्तीमय सेवेची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने पिंपळे दाम्पत्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
मंदिर संस्थानतर्फे त्यांना देवीजींची एक सुंदर प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूरात चैत्र पौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेवर विशेष भर

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर | महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होत असून, यात्रेनिमित्त तुळजापूरमध्ये लाखो…

    तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा प्रयत्न उधळला; महिला रंगेहात पकडली

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळण्यात आला असून एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले आहे. निंबाळकर दरवाजा ते राजे शहाजी महाद्वार परिसरातील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *