भारतीय जनता पार्टी धाराशिव शहर अध्यक्षपदी अमित शिंदे यांची निवड – युवा नेत्यांकडून उत्साहात स्वागत व सत्कार

Spread the love

धाराशिव : – धाराशिव शहरात भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांची नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा होताच, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.

अमित शिंदे हे नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे परिचित असून, त्यांनी जनसामान्यांशी असलेले घनिष्ठ संबंध, समस्या सोडवण्याची तत्परता आणि भाजपाच्या विचारांप्रती निष्ठा या गुणांमुळे पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या नेतृत्वात धाराशिव शहरातील पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी युवा नेते अभिजीत पतंगे व उमेश चव्हाण यांनी अमित शिंदे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारप्रसंगी दोघांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “शहर अध्यक्षपदी अमित भैय्या यांची निवड ही योग्य व्यक्तीला दिलेली योग्य जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची घडी अधिक मजबूत होईल.”

भाजपाच्या शहर कार्यकारिणीत ही नियुक्ती नवीन ऊर्जा निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. शहरातील विविध स्तरांतील पक्ष कार्यकर्ते व नागरिकांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

  • Related Posts

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *