‘मी तुझ्याकडे भीक मागतो’, पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर ठपका

Spread the love

मुंबई -: पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निशांत त्रिपाठी (वय- ४२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. निशांतने कंपनीच्या वेबसाईटवर सुसाईड नोट अपलोड केली आहे. त्यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या नातेवाईकावर ठपका ठेवला आहे. ही घटना (दि.२८) विलेपार्ले येथील सहारा हॉटेलमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांतने आत्महत्येच्या तीन दिवस आधी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. ज्या दिवशी निशांतने आत्महत्या केली, त्या दिवशी त्याने आपल्या खोलीबाहेर ‘डू नॉट डिस्टर्ब’ असा फलकही लावला होता. मात्र बराच वेळ त्याने खोलीचा दरवाजा न उघडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता निशांतचा मृतदेह खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. ही सुसाईड नोट निशांतने मृत्यूपूर्वी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केली होती. त्याने आपल्या मृत्यूला पत्नी आणि मावशीला जबाबदार धरले.

निशांतने सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे की , ” हाय बेव, तू हे वाचशील तोपर्यंत मी निघून गेलो असेल. जे काही झालं त्याबद्दल मी तुझा शेवटच्या क्षणापर्यंत द्वेष करु शकलो असतो. पण, मी या क्षणी प्रेमाची निवड केली आहे. मी तुझ्यावर तेव्हाही प्रेम करत होतो. मी तुझ्यावर आजही प्रेम करतो. मी वचन दिलंय त्याप्रमाणे हे प्रेम कधीही कमी होणार नाही. मी किती संघर्ष केलाय हे माझ्या आईला माहिती आहे. तू आणि प्रार्थना मावशीच माझ्या मृत्यूचं कारण आहेत. त्यामुळे मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या आईकडं जाऊ नकोस. ती कोसळली असेल. तिला एकटीनं शोक व्यक्त करु दे ” असा आशय यामध्ये मांडलेला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मृत निशांतच्या आईने मुंबई विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. निशांतची पत्नी अपूर्वा पारिख आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा यांच्याविरोधात बीएनएस कलम १०८ अन्वये तक्रार दाखल केली आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *