अनैतिक देह व्यापार करणा-या महिला विरुध्द धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) :पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 27.02.2025 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, धाराशिव शहरातील शेकापुर रोड बालाजी नगर येथे एक महिला घरामध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद घरात 14.55 वा. सु. छापा टाकला असता घरामध्ये मध्ये एक महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत तिची विचारपुस केली असता रत्नमाला सतीश मदने, वय 46 वर्षे, रा. शेकापुर रोड बालाजी नगर धाराशिव हिचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होती व नमुद महिला त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहे असे समजले. यावरुन पथकाने नमुद महिला- रत्नमाला सतीश मदने, वय 46 वर्षे, रा. शेकापुर रोड बालाजी नगर धाराशिव हीचे ताब्यातुन रोख रक्कम 7,900 व निरोधची पाकीटे असा एकुण 7,970 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या ताब्यातुन त्या महिलेची सुटका करुन नमुद महिला नामे- रत्नमाला सतीश मदने, वय 46 वर्षे, रा. शेकापुर रोड बालाजी नगर धाराशिव हिचेविरुध्द गुरनं 92/2025 भा.न्या. सं. कलम- 143, 144, सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5,7 अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दि. 27.02.2025 रोजी गुन्हा नोंदवला आहे. सदरची कामगिरी.पोलीस अधीक्षक.संजय जाधव व. अपर पोलीस अधीक्षक. गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हावलदार- विनोद जानराव, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शोभा बांगर, पोलीस नाईक अमंलदार- बबन जाधवर, नितीन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, विजय घुगे पोलीस अमंलदार-दहिहांडे, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे सपोफौ /108 पुरके यांच्या पथकाने केली.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *