धाराशिव (प्रतिनिधी): भवानी चौक सांजा रोड सांजा चौक, १८ फेब्रुवारी २०२५ – श्री शिवजयंती उत्सवानिमित्त शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि भवानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अधिष्ठाता डॉ. गंगासागरे यांच्या मार्गदर्शनानुसार मोफत आरोग्य तपासणी- उपचार आणि बीपी-शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण ८३ रुग्णांची आरोग्य तपासणी, तसेच ६० नागरिकांची रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.
शिबिराचे सूत्रसंचलन डॉ. टिके, प्रभारी विभाग प्रमुख, पंचकर्म विभाग, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांनी केले. तसेच, आयुर्वेद महाविद्यालयातील पी.जी. विद्यार्थी व इतर स्टाफ या उपक्रमात सहभागी झाले होते.
या उपक्रमाद्वारे समाजाच्या आरोग्यविषयक जागृतीस हातभार लावण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. भविष्यात अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.