दहा मोटरसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दहा मोटरसायकलसह एक आरोपी ताब्यात घेतला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आबा उर्फ अशोक अर्जुन पवार (रा. उमरा, ता. कळंब, जि. धाराशिव) याच्याकडे चोरीच्या मोटरसायकली आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला कळंब येथे शोधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बीड येथून एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याने त्याच्या चुलत्यासोबत मिळून आणखी मोटरसायकली चोरल्याचे उघड झाले.

पोलीस पथकाने आरोपीकडून धाराशिव, बीड, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेल्या १० मोटरसायकली (एकूण किंमत ३ लाख रुपये) जप्त केल्या. पुढील कारवाईसाठी आरोपीस धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस कर्मचारी जानराव, निंबाळकर, वाघमारे, जाधवर, अरब, दहीहंडे, गुरव आदींनी केली.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *