धाराशिव शहरातील भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्यावतीने दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सांजा रोड भवारी चौक विद्यामाता हायस्कूलच्या मागे एसटी कॉलनी येथे धाराशिव शहरातील शिवप्रेमी साठी छत्रपती शिवरायांच्या विचारांना स्पर्श करणारे तडाखे बंद नाटक ‘महाराष्ट्र माझा’ याचे आयोजन करण्यात आले आहे तरी हे नाटक पाहण्यासाठी शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष लिंबराज डुकरे यांनी केले आहे या नाटकाचे उद्घाटन खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगदीशसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील असणार आहेत