पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the love

धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) – विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पुरस्कार समितीचे समन्वयक गणेश शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने दि.१९ फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले.

धाराशिव शहरातील पवन राजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. या सोहळ्यास नितीन गरड, जगदीश शिंदे, संपादक राजेंद्र बहिरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्यासह इतरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  • Related Posts

    धाराशिव जनतेच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट खासदार पुरस्कार मिळण्याचा मान– खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर .               

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज धाराशिव (प्रतिनिधी) सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार”…

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर

    Spread the love

    Spread the love माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *