आगीत नुकसान झालेल्या तुळजापूरातील मंडप डेकोरेशन दुकानाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश!

Spread the love

तुळजापूर : येथील नारायण भोसले यांच्या मंडप डेकोरेशन दुकानाला काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त दुकानाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी नारायण भोसले व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आगीच्या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली. दुकानातील जळालेल्या साहित्याची पाहणी करून कुटुंबीयांच्या अडचणीही समजून घेतल्या.
या कठीण प्रसंगी भोसले कुटुंबीयांना शासकीय स्तरावर आवश्यक मदत मिळावी, यासाठी आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.
आगीच्या दुर्घटनेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भोसले कुटुंबीयांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी शक्य ते सहकार्य मिळावे, अशी सदिच्छा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

  • Related Posts

    दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

    Spread the love

    Spread the loveप्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांचा पुजारी नगर फाउंडेशनतर्फे सत्कार तुळजापूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांनी मंगळवारी (दि. १७) तुळजापूर येथे…

    सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे महिला भाविकाची पर्स मिळाली परत

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परत मिळाली. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार यांना आज बुधवार, दि. १८ नोव्हेंबर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *