
तुळजापुर – श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परत मिळाली. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार यांना आज बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर एक पर्स आढळून आली.
त्या पर्समध्ये २ हजार ५२० रुपये रोख रक्कम तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे होती. सुरक्षा रक्षक सोनार यांनी ही पर्स दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली.
दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पुणे येथील महिला भाविक निशा रोहित काळे या आपली पर्स हरवल्याची विचारणा करण्यासाठी दर्शन मंडप नियंत्रण कक्षात आल्या. त्यावेळी त्यांची ओळख व पर्समधील वस्तूंची खात्री करून ती पर्स त्यांना परत करण्यात आली.
यावेळी सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार, विष्णू गायकवाड, सागर सोनवणे, विष्णू कोळी व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते