सुधीर अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर; २५ नवजात बालकांसह २६५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात, २०१ ऊसतोड कामगार कुटुंबांनाही भेटवस्तूंचे वाटप!

Spread the love

धाराशिव : शिवसेना नेते तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (अण्णा) पाटील यांचा वाढदिवस १७ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांसह त्यांच्या मातांना भेटवस्तूंचे वाटप, रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, गरजू कुटुंबांना किराणा साहित्य तसेच ऊसतोड कामगार कुटुंबांना साडी व ड्रेसचे वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव येथे १७ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या २५ नवजात बालकांना आणि त्यांच्या मातांना साडी-चोळी व ड्रेस किटचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण रुग्णालयात फळांचे वाटप करून रुग्णांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. याशिवाय परिसरातील २६५ गरजू कुटुंबांना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीत करण्यात आला. त्यानंतर उर्वरित कुटुंबांना किटचे वितरण करण्यात आले.

याचबरोबर हातलाई शुगर्स प्रा. लि. च्या वतीने कारखान्याशी जोडलेल्या २०१ ऊसतोड कामगार कुटुंबांना साडी व ड्रेसचे वाटप करण्यात आले. कारखान्याच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ऊसतोड कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, कारखान्याचे प्रतिनिधी थेट ऊसाच्या फडात जाऊन कामगारांना भेटवस्तूंचे वाटप केले. कारखान्याकडून अशा प्रकारे थेट शेतात येऊन भेटवस्तू मिळाल्याने कामगार कुटुंबांनी आनंद व्यक्त केला.

व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सुधीर अण्णा पाटील यांनी नेहमीच केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात देतानाच रुग्ण, नवजात बालके, माता आणि ऊसतोड कामगारांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यातही हातलाई शुगर्सच्या माध्यमातून कामगार, शेतकरी आणि समाजाच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमांना संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, हातलाई शुगर्सचे चेअरमन अभिराम पाटील, अश्विनी मळेकर, डॉ. गवळी मॅडम, डॉ. रामढवे सर, वुमन्स हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, कळंब तालुक्यातील मान्यवर, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच धाराशिवमधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

  • Related Posts

    दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

    Spread the love

    Spread the loveप्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांचा पुजारी नगर फाउंडेशनतर्फे सत्कार तुळजापूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांनी मंगळवारी (दि. १७) तुळजापूर येथे…

    सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे महिला भाविकाची पर्स मिळाली परत

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परत मिळाली. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार यांना आज बुधवार, दि. १८ नोव्हेंबर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *