दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

Spread the love

प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांचा पुजारी नगर फाउंडेशनतर्फे सत्कार

तुळजापूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांनी मंगळवारी (दि. १७) तुळजापूर येथे येऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देशवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

दर्शनानंतर पुजारी नगर फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते देवीची प्रतिमा, कवड्याची माळ आणि कुंकू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, विभागीय परिचलन व्यवस्थापक नरेंद्र वर्मा, लातूरचे रेल्वे स्थानक प्रबंधक संजय अर्धापुरे, फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते बापू जगदे, तालुकाध्यक्ष राहुल जाधव आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे महिला भाविकाची पर्स मिळाली परत

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परत मिळाली. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार यांना आज बुधवार, दि. १८ नोव्हेंबर…

    दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला धाराशिव जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

    Spread the love

    Spread the love‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – उमेश राजे निंबाळकर धाराशिव : माननीय उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी,…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *