रुपामाता परिवार धाराशिव कडून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ₹५ लाख १ हजारांचा धनादेश सुपूर्द.

Spread the love

(सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस योगदान; २०१४ व २०१९ मध्येही ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्याकडून मदतीचा हात)

धाराशिव – महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पावसाचे असमान वितरण, पाणीटंचाई आणि शेतीसमोरील वाढती संकटे लक्षात घेता, संकटग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत मिळावी, या सामाजिक भावनेतून रुपामाता परिवार धाराशिव यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

रुपामाता परिवाराचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार श्री. संजय केनेकर तसेच राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. किरण झरकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसतो. पाणीटंचाई, पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील ताण अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतकार्यात हातभार लावणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे, या भावनेतून रुपामाता परिवाराने हे योगदान दिले आहे.

विशेष म्हणजे, रुपामाता परिवाराने यापूर्वीही २०१४ ला दुष्काळ निवारणासाठी २लाख१हजार व २०१९ ला कोरोना निवरणासाठी ०१ लाख २१ हजार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  कडे मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत दिली होती. सामाजिक उत्तरदायित्वाची ही परंपरा कायम राखत यंदाही परिवाराने पाच लाख एक हजार रुपयांचे योगदान दिले आहे.

उद्योग, विधी, सहकार, अर्थ, कृषी, दुग्ध, शिक्षण, सामाजिक कार्य, युवा व महिला सक्षमीकरण, आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेला रुपामाता परिवार सामाजिक सहभाग, सहकार्य आणि लोकहिताच्या उपक्रमांना  नेहमीच प्राधान्य देत आला आहे. समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी एकत्रितपणे योगदान देणे, हीच परिवाराची कार्यप्रणाली असून भविष्यातही विविध सामाजिक व लोकहिताच्या उपक्रमांतून आपले योगदान कायम ठेवण्याचा परिवाराचा मानस आहे.

  • Related Posts

    दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

    Spread the love

    Spread the loveप्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांचा पुजारी नगर फाउंडेशनतर्फे सत्कार तुळजापूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक के. पद्मजा यांनी मंगळवारी (दि. १७) तुळजापूर येथे…

    सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे महिला भाविकाची पर्स मिळाली परत

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परत मिळाली. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार यांना आज बुधवार, दि. १८ नोव्हेंबर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *