
तुळजापूर : दिवाळी आणि भाऊबीजेच्या पवित्र सणानिमित्त भाजप युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर नगरपालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत भाऊबीजेचा आनंद साजरा केला. भारतीय जनता पार्टी, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

तुळजापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी महिला स्वच्छता कर्मचारी दररोज मेहनत घेत असतात. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या या स्वच्छतादूत भगिनींचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

सण-उत्सवांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकासोबत वाटून घेणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि त्यांच्या योगदानाची दखल घेणे, हाच या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी तुळजापूर नगरपालिकेतील नगरसेवक, महिला स्वच्छता कर्मचारी, नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.