तेर | भक्तीचा अखंड वारसा…

Spread the love

पवित्र कार्तिकी वारीनिमित्त संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीतून काकांच्या पायी दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने पंढरीकडे प्रस्थान झाले.

टाळ-मृदंगाचा गजर, मुखी विठ्ठलनाम आणि पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ…अशा भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला.

संत गोरोबा काका हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील ज्येष्ठ संत. संत ज्ञानेश्वरादी संतांच्या मांदियाळीत त्यांचे स्थान अत्यंत आदरणीय आहे. वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेतील काकांचे योगदानही अजरामर आहे.

तेरची ही दिंडी म्हणजे केवळ पंढरपूरकडे जाणारी वारी नाही; तर शेकडो वर्षांपासून जपलेला भक्तीचा, समतेचा आणि विठ्ठलनामाचा अनमोल वारसा आहे.

या दिंडीच्या माध्यमातून तेरचे आध्यात्मिक वैभव आणि गोरोबा काकांची भक्तीपरंपरा आजही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम!

  • Related Posts

    दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा गोडवा – पानगावच्या पारधी वस्तीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveनागरिकांच्या व्यथा जाणून घेत समस्यांच्या निवारणाची दिली ग्वाही दिवाळीच्या मंगल पर्वावर जिल्हाधिकारी पुजार यांनी ९ नोव्हेंबर रोजी रात्री मौजे पानगाव येथील पारधी वस्तीला भेट दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी…

    शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे रायगडावरील रहिवाशांना दिवाळी फराळ वाटप

    Spread the love

    Spread the loveतामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न प्रतिष्ठानचे सचिव श्री. दत्तात्रय (अप्पूराजे) भोसले यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी, सुरतगाव, गगेवाडी व होनसळ या गावातील सर्व शिवभक्तांच्या वतीने रायगडावरील राहणाऱ्या सर्व…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *