ई-रिक्षा,ई-कार्ट चालकांना १० दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक

Spread the love

किमान ५ तास वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आवश्यक ; वैध मोटार ट्रेनिंग सेंटरमधूनच घ्यावे लागणार प्रशिक्षण

धाराशिव – ई-रिक्षा आणि ई-कार्ट वाहन चालविण्यासाठी अनुज्ञप्ती धारण करू इच्छिणाऱ्या चालकांना आता किमान १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणामध्ये किमान ५ तास प्रत्यक्ष वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक राहणार आहे.शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत आणि निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

केंद्र शासनाच्या केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ मधील नियम ८A मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.या सुधारणेनुसार ई-रिक्षा व ई-कार्ट चालविण्यासाठी अनुज्ञप्ती धारण करण्याकरिता किमान १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यानुसार राज्य शासनाने मान्यता दिलेल्या १० दिवसांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाची तसेच संबंधित नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासन पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.ई-रिक्षा किंवा ई-कार्ट वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती देताना संबंधित प्रशिक्षण केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ नुसार प्राधिकृत करण्यात आलेल्या वैध मोटार ट्रेनिंग सेंटरमार्फतच देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच यासाठी गठित समितीने सादर केलेल्या १० दिवसांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमालाही शासनाने मान्यता दिली आहे.

या पार्श्वभूमीवर जनतेला सूचित करण्यात आले आहे की,केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ अन्वये ई-रिक्षा व ई-कार्ट ही वाहने चालविण्यासाठी संबंधित वाहनचालकाने त्या वर्गाची विहित अनुज्ञप्ती धारण करणे आवश्यक आहे.तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ अन्वये सार्वजनिक सेवा वाहन चालविणाऱ्या चालकाने विहित अनुज्ञप्तीसह प्राधिकारपत्र (PSV Authorisation) आणि ओळखपत्र बॅज धारण करणे आवश्यक आहे.

ई-रिक्षा व ई-कार्ट चालकांसाठी निर्धारित प्रशिक्षण हे शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत आणि शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार पूर्ण करणे आवश्यक आहे.प्रशिक्षणाचा कालावधी १० दिवसांचा असून, त्यामध्ये किमान ५ तास वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल.याशिवाय शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परिवहन संवर्गाचे सर्व नियम लागू राहतील.

ई-रिक्षा हे सार्वजनिक सेवा वाहन चालविणाऱ्या चालकाने विहित अनुज्ञप्तीसह प्राधिकारपत्र (PSV Authorisation) आणि ओळखपत्र धारण करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे ई-रिक्षा व ई-कार्ट चालविण्याची अनुज्ञप्ती घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी शासनमान्य संस्थेतून विहित १० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करून आवश्यक अनुज्ञप्ती,प्राधिकारपत्र व ओळखपत्रासंबंधीच्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

  • Related Posts

    ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर; २६ ऑक्टोबरला भव्य मिरवणूक

    Spread the love

    Spread the loveनागालँड येथील अघोरींचा नयनरम्य कार्यक्रम; ‘खेळ पैठणीचा’सह डान्स स्पर्धेचे आयोजन धाराशिव (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदाही धाराशिव शहरातील ठाकरेनगर येथे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध…

    अवैध दारू विक्रीची माहिती तात्काळ पोलिसांना द्या

    Spread the love

    Spread the loveपदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांना सतर्कतेच्या सूचना धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील अवैध दारू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *