भारतीय संविधान..मतदार जनजागरण समितीचा उपक्रम.

धाराशिव :- मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाची जनजागृती सातत्याने विविध उपक्रम राबवुन करण्यात येत असुन शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी संविधान जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती व संविधानिक मुल्यांचे ज्ञान व्हावे, या उद्देशाने शम्सुल उलुम उर्दु हायस्कुल, धाराशिव येथे उर्दु भाषेत संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या एकूण २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार स्वतंत्र प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. संविधान जनजागृतीच्या उद्देशाने शाळेच्या वतीने परीक्षेचे शिस्तबद्ध व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा.रेशमा काझी व व्यवस्थापिका डॉ.तबस्सुम सय्यद यांनी शाळेची माहिती देत विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व समजावे यासाठी हा उपक्रम राबविला जात असुन प्रतिसाद पाहुन मतदार जनजागरण समितीच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी समितीच्या वतीने सुरू असलेल्या संविधान जनजागृती उपक्रमांची माहिती दिली.विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.हा संविधानाच्या जनजागृतीचा महत्त्व पुर्ण असा उपक्रम असुन भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत यावरती आधारित प्रश्न आहेत,तसेच प्रश्नमंजुषा परीक्षेचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्याबद्दल शाळेचे आभार मानले.यावेळी समितीचे सचिव अब्दुल लतीफ,कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, कोषाध्यक्ष शेख रौफ, सहसचिव बाबासाहेब गुळीग, सदस्य प्रा.अभिमान हंगरगेकर, बिलाल रजवी,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा.रेशमा काझी व्यवस्थापिका डॉ. तबस्सुम सय्यद, शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
“जिथे जाल तिथे वाचाल भारतीय संविधान” या भावनेतुन विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख आणि जनजागृती करण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला.