
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत नीरा भीमा जोड बोगदा व जेऊर बोगद्याचे काम पूर्णत्वास नेण्याची भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता, जलविज्ञान विभागाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाची पाणी मान्यता, निधीची तरतूद नसल्याने आदी गंभीर त्रुटींमुळे रद्दबातल झालेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच पुनरूज्जीवन!

दोन्ही बोगद्यांचे थोडके राहिलेले काम क्षेत्रीय स्थळी साडेतीन वर्षापासून ठप्प!
उजनीत कृष्णेचे अतिरिक्त पाणी आल्याशिवाय धाराशिव जिल्ह्यात पाणी येणार नाही!
जेऊर बोगद्याचे 27 कि. मी. पैकी केवळ 700 मीटर आणि नीरा भीमा बोगद्याचे 23.6 कि. मी. पैकी 1.6 कि. मी. काम बाकी!
पहिल्या टप्प्यातील 7 टीएमसी पाण्यातून जिह्यातील 25,800 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ!
परंडा व भूम तालुक्यातील उपसा सिंचन योजना क्र. 1 ते 5 तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत!
धाराशिव जिल्हा दुष्काळ पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी पत्र देऊन केली मागणी!