पात्र लाभार्थ्यांनी ई केवासी (E- KYC) करणे अनिवार्य

Spread the love

धाराशिव – सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो.अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक सुलभ व प्रभावी होण्याच्या दृष्टीने पात्र लाभार्थ्यांना ई केवासी (E- KYC) करणे अनिवार्य आहे. करिता लाभार्थ्यांना एक देश एक शिधापत्रिका योजनेप्रमाणेच त्यांच्या स्वगृही राज्यात न जाता कोणत्याही ठिकाणाहून E- KYC प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण करण्याची सुविधा केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या सुविधा ई-पॉस मशिनवर कार्यान्वित करण्यात आली आहे.

याकरिता शासनाकडून E- KYC न झालेल्या लाभार्थ्यांची यादी तालुकानिहाय व दुकाननिहाय प्राप्त करून देण्यात आलेली आहे. सदरची यादी सर्व तहसिल कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे वितरीत करण्यात आलेली आहे.या यादीतील सर्व शिधापत्रिकाधारक यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसमवेत आपले आधारकार्ड सहित संबंधित स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन प्राधान्याने ०-POS मशिनवर अंगठा प्रमाणित करून आपले E- KYC प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे किंवा Mera KYC मोबाईल अॅप्लीकेशन द्वारे माहे सप्टेंबर-२०२६ अखेर E-KYC प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, अन्यथा ज्या लाभार्थ्यांचे E- KYC प्रमाणीकरण पुर्ण होणार नाही अशा लाभार्थ्यांचा अन्नधान्य लाभ वाटप थांबेल.सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांनी आपले E- KYC प्रमाणीकरण दि.३० सप्टेंबरपर्यंत करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  • Related Posts

    जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हयात दि.१४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्री गणेश उत्सव साजरा होणार आहे. श्री.गणेश उत्सव निमित्त जिल्हाभर दिनांक १४ ते २६ सप्टेंबर पावेतो विविध पक्ष संघटना…

    पीक पाहणीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर कराजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveजिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती आढावा बैठक धाराशिव – जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र,ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *