धाराशिव जिल्हयातील महिलांनी आर्थिक,सामाजिक व राजकीय दृष्टया सक्षम व्हावे किर्ती किरण पुजार,जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आवाहन

Spread the love

धाराशिव – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धाराशिव व महिला व बाल विकास विभाग जि.प.धाराशिव व महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त दि.09.03.2026 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराशिव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन मा.किर्ती किरण पुजार,जिल्हाधिकारी धाराशिव व प्रमुख अतिथी म्हणुन श्री मैनाक घोष,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धाराशिव,श्री.काळे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धाराशिव श्री.देवदत्त गिरी,उपमुख्यकार्यकारी म.बा.क जि प धाराशिव ,श्री किशोर गोरे,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी धाराशिव,श्री.गणेश कुकडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी परंडा,श्रीम.रेश्मा पठाण,बाल विकास प्रकल्प अधिकारी धाराशिव,श्री.सुखदेव चिंचोलीकर,प्रकल्प समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव हे हजर होते. सदर कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या जिल्हयातील कतृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला.सदर

कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिला सक्षम होणे आवश्यक आहे. महिला ही कुटुंबाचा आधार आहे. महिला शिकुन सर्व कुटुंबाचा उध्दार करते. महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद मार्फत बचत गट स्थापन करुन महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन करुन उपस्थित महिलांना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेवुन आपले कुटुंब आर्थिकदृष्या सक्षम करावे असे आवाहन केले तसेच उपस्थित अतिथी यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण करुन हजर महिलांचे मनोबल वाढविले.सदर कार्यक्रमास जिल्हयातील 300 महिला हजर होत्या.सदर कार्यक्रमामध्ये बाल विवाह प्रतिबंधाची शपथ घेण्यात आली व बाल विवाहाची माहिती मिळाल्यास 1098 व महिला हिंसाचाराची माहिती मिळाल्यास 181 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच सदर कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या सर्व योजना व सामाजिक कायदे याची सविस्तर माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी – कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गणेश कुकडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी यानी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती वैशाली आव्हाड,शहर अभियान व्यवस्थापक,नगर परिषद धाराशिव यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती प्रियंका जाधव,केंद्रप्रशासक ,सखी वन स्टॉप सेंटर धाराशिव यांनी केले.हिंसाचार पिडीत बालक व महिला यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कक्ष क्रं.27 धाराशिव येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *