धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेत जेजुरी (पुणे) संघ विजेता; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण.

Spread the love

विश्व प्रशांत न्यूज(प्रतिनिधी)
धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून विविध संघांनी सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अंतिम सामन्यात जेजुरी, पुणे येथील संघाने शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. डोरलेवाडी, बारामती संघाने द्वितीय क्रमांक, येडशी-धाराशिव (A) संघाने तृतीय क्रमांक, तर सोलापूर पोलीस, सोलापूर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रवीण भैय्या कोकाटे, श्वेता दुर्गकर, सोमनाथ आप्पा गुरव, अमित उंबरे, प्रशांत बापू साळुंखे, हनुमंत देवकते, जाधवर सर, प्रवीण केसकर, राकेश सूर्यवंशी, शिवयोगी चपणे, अभिजीत देशमुख, सत्यजित पडवळ, विश्वजीत देशमुख, मनोज पडवळ, अक्षय खळदकर, सात्विक दंडनाईक, रोहन देशमुख आदींसह अनेक मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.युवासेना तालुका प्रमुख लखन बापू देशमुख व युवासेना शहर प्रमुख अभिराज कदम यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करत भविष्यात अशा क्रीडा स्पर्धांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बेडची येडशी-धाराशिव, घाटी, आदर्श, पोहनेर आणि जय जिजाऊ हॉलीबॉल क्लब या स्थानिक संघांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण महाराष्ट्रातून संघांनी हजेरी लावल्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

  • Related Posts

    जिल्हाधिकारी डॉ.किर्ती किरण पुजार यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ.पुजार यांच्या निवासस्थानी…

    फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- लोकराजा,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *