
धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ.पुजार यांच्या निवासस्थानी झालेल्या या सदिच्छा भेटीत ‘अनोखी परी’च्या हस्ते साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ हे पुस्तक, शाल व मिठाई देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पुजार यांनी व्यस्त शासकीय कामकाजातून वेळ काढून अनोखी परीशी आपुलकीने संवाद साधला.या संवादादरम्यान त्यांनी अनोखी परीच्या शैक्षणिक वाटचालीसह घर-परिवार, शिक्षण आणि विविध सामाजिक बाबींवर चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी मुलीच्या शिक्षणाबाबत आस्थेने विचारपूस करत तिला प्रोत्साहन दिले.यावेळी अनोखी परी, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने यांच्यासह इतर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार यांना वाढदिवसानिमित्त निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी गणेश वाघमारे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.